
पेट्रोल १०० पार, डिझेल ९०.१७ रूपये लिटर
Saturday, May 22, 2021
Edit
बारामती - कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेल्या लाॅकडाऊनमुळे जनसामान्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. यात भर म्हणून लाॅकडाउनदरम्यान महागाईचा आलेख वाढता राहिला आहे. त्यात शनिवारी(ता.२२) बारामतीत पेट्रोल शंभरी पार झाले आहे. तर डिझेल ही ९०.१७ रूपये प्रतिलिटर झाले आहेत. त्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या बारामतीकरांच्या खिशाला पेट्रोल व डिझेल दरवाढाचा फटका सहन करण्याची वेळ आली आहे.
मागील दीड वर्षांपासून देशासह राज्यात कोरोना संसर्गाचा प्रसार सुरू आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केंद्र शासनाने गतवर्षी लाॅकडाउन लागू केले होते. तर राज्य शासनाने गतवर्षीसह यंदाही ता.१५ एप्रिलपासून राज्यात लाॅकडाउन लागू केले आहे. या लाॅकडाउनमध्ये असंख्य नागरिकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. अनेकांचे रोजगार ही गेले आहेत. या महामारीत महागाईचा आलेख खाली आणूण शासन सामान्य नागरिकांना दिलास देईल अशी अपेक्षा होती.
मात्र, मागील दीड वर्षांपासून आर्थिक संटकात असलेल्या जनसामान्यांसाठी महागाईचा आलेख नियंत्रणात ठेवण्यास केंद्रासह राज्य शासनाला अपयश आले आहे. त्यामुळे खाद्यतेल, घरगुती गॅस, डाळी, पेट्रोल दरवाढ ही लाॅकडाउनदरम्यान झाली आहे. या लाॅकडाउनमध्ये कमाईचे साधन गमावल्यानंतर महागाईचे चटे सामान्य नागरिकांना बसत आहेत. त्यामुळे लाॅकडाउनमध्ये आर्थिक संकाटात आलेल्या सामान्य नागरिकांच्या डोक्यावर पेट्रोल व डिझेल दरवाढीचे ओझे लादले गेले आहे.