-->
जिंती येथील कोरोना विलगिकरण केंद्रास के.बी उद्योगसमूहातर्फे मदतीचा हात

जिंती येथील कोरोना विलगिकरण केंद्रास के.बी उद्योगसमूहातर्फे मदतीचा हात

जिंती: कोरोना केसेस मध्ये फलटण तालुका हा जिल्ह्यात क्रमांक एक ला असल्यामुळे तालुक्यामध्ये चिंताजनक व भयावह वातावरण झाले आहे.
         परिस्तिथी सोबत दोन हात करण्यासाठी अनेक ग्रामपंचायत व त्या मधील सामाजिक राजकीय कार्यकर्ते यांची कमिटी असे मिळून विलगिकरंण केंद्र सुरू करत आहेत. विलगिकरंण केंद्र जरी सुरू होत असले तरी त्या मध्ये सुखसोयींची मात्र वानवा भासत आहे, अशीच एक समस्या जिंती विलगिकरंन केंद्रास भासत होती. 
         त्यावेळी जिंती ता फलटण येथील श्री सरपंच , उपसरपंच तसेच ग्रा पंचायत सदस्य यांनी के बी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा श्री सचिन यादव साहेब यांची भेट घेतली व त्यांना याबाबत ची अडचण सांगितली.
        त्यावेळी मा सचिन यादव साहेब यांनी त्यांची आपुलकीने चौकशी करून कमिटी ला तांत्रिक मुद्द्यावर देखील माहिती दिली, तसेच कंपनी तर्फे १५ वाफेचे मशीन, ३ ऑक्सिमिटर, टेम्प्रेसचेर मीटर, १ बी पी मशीन, अशी सामुग्री भेट म्हणून दिली.
         तसेच सदरचे कार्य हे माणुसकी जिवंत ठेवण्यासाठी महत्वाचे असल्यामुळे विलगिकरण केंद्रास पुढे देखील मदत करण्याची तयारी दर्शवली.  जिंती विलगिकरंण केंद्रातर्फे जिंती ग्रामपंचायातीचे सरपंच यांनी आभार व्यक्त केले.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article