-->
बारामती: हिराबाई बुताला ट्रस्टतर्फे फिरता दवाखाना सुरु

बारामती: हिराबाई बुताला ट्रस्टतर्फे फिरता दवाखाना सुरु

मोरगाव : बारामती तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांसाठी  हिराबाई बुताला ट्रस्टतर्फे  एक महीन्यासाठी  फिरता दवाखाना सुरु केला आहे . याद्वारे रुग्णांची  ऑक्सिजन पातळी, रक्तदाब, तसेच किरकोळ आजारावर उपचार केले जाणार आहेत. याचे  मोरगांव येथे उद्घाटन सरपंच निलेश केदारी यांच्या हस्ते करण्यात आले.

 उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या माध्यमातून किरण गुजर व  पुणे महानगरपालिका सह आयुक्त संदीप ढोले यांच्या सहकार्याने बारामती तालुक्यात फिरता दवाखाना सुरु केला आहे. पुढील  एक महीन्यासाठी हा  दवाखाना सुरु राहणार आहे. मोरगाव  येथे  फिरत्या दवाखान्याचे उद्घाटन  आज सरपंच निलेश केदारी  यांच्या हस्ते झाले. यावेळी  ग्रामसेवक मोरेश्वर गाडे,वैद्यकीय अधीकारी अनिल वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते शंकर ढोले, वैद्यकीय अधीकारी आगवणे, त्रीवेदी, आशा सेविका, मोरगाव फाऊंडेशनचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. 

तालुक्यातील प्रत्येक गावांत जाऊन रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. सध्याच्या कोरोना काळात  ट्रस्ट मार्फत सामाजिक कार्य होत असल्याने परीसरातील ग्रामस्थांकडून  समाधान व्यक्त केले जात आहे . 

 

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article