
कराटे ब्लॅक बेल्ट स्पर्धेत शोनक महानवर प्रथम
Monday, June 21, 2021
Edit
सोमेश्वरनगर - वाणेवाडी (ता बारामती) येथील कराटे ब्लॅक बेल्ट स्पर्धेत सोनक महानवर यांनी प्रथम क्रमांक पटकावला जुदो कराटे कीक बॉक्सिंग मार्शल आर्ट असोसिएशनच्या वतीने दोन दिवसीय योग कराटे फाइट बॉक्सिंग लाटी काठी नान-चाक तलवारबाजी सूर्यनमस्कार प्राणायाम प्रशिक्षण घेण्यात आले या कॅम्प मध्ये सोमेश्वर नगर परिसरातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता कॅम्पचे उद्घाटन आयुर्वेदिकचार्य डाॅ. निरंजन निगडे यांच्या हस्ते झाले अध्यक्षस्थानी धनंजय भोसले अशोक भोसले सुनील भोसले डॉ रवींद्र सावंत प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नवनाथ कारंडे आदी उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष प्रकाश रासकर ब्लॅक बेल्ट मास्टर चंद्रकांत सोनवणे हर्षवर्धन जगदाळे आशितोष साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले स्पर्धेतील प्रथम क्रमांक विद्यार्थी
येलो व ऑरेंज बेल्ट- कार्तिकी पवार शौर्य कोंडे मयुरेश भोसले
ऑरेंज व ग्रीन बेल्ट- सोनाक्षी जेधे अविनाश गायकवाड अभिनव जगताप
ग्रीन व ब्ल्यू बेल्ट- दुर्गा भोसले
ब्ल्यू व पर्पल बेल्ट - ओजस निगडे
पर्पल फर्स्ट सेकंड बेल्ट - रुद्र कोकरे
ब्राऊन सेकंड व थर्ड बेल्ट- अथर्व बुनगे
ब्राऊन थर्ड व ब्लॅक बेल्ट- सोनक महानवर या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला यशस्वी विद्यार्थ्यांना मा. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विक्रम भोसले तसेच विक्रांत जगताप दुष्यंत चव्हाण यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.