-->
कृषी पदवीधर संघटनेच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी राधेशाम गायकवाड

कृषी पदवीधर संघटनेच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी राधेशाम गायकवाड

निंबुत : कृषी पदवीधर संघटनेच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी नुकतीच राधेशाम गायकवाड यांची निवड झाली आहे. कृषी पदवीधर संघटना ही महाराष्ट्रातील राज्य पातळीवरील कृषी व संलग्न पदवीधरांनी, पदविकाधारकांनी स्थापन केलेली राज्यातील सर्वात पहिली बिगर राजकीय असलेली सामाजिक संस्था आहे.
         शेतकरी व कृषी पदवीधर विद्यार्थ्यांच्या तत्कालीन ज्वलंत प्रश्न आणि समस्या सोडविण्यासाठी संघटना सदैव कार्यरत आहे. 
        कृषी पदवीधर संघटना पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया नुकतीच यशस्वीरित्या पार पडली. यावेळी बारामती तालुक्यातील खंडोबाचीवाडी येथील राधेशाम गायकवाड यांची पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. संघटनेचे संस्थापक महेश कडुस पाटील, अध्यक्षा मंगल कडूस पाटील, पुणे जिल्हा विद्यार्थी अध्यक्ष गणेश कायगुडे पाटील तसेच विद्यार्थी आघाडी प्रदेश अध्यक्ष मनीष भदाने यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली. 
यावेळी संघटनेचे उद्देश तळागाळापर्यंत पोचवून कृषी पदवीधरांचे व शेतकऱ्यांचा समस्या शासन दरबारी मांडून ते सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे तर वरिष्ठांनी दाखवलेला विश्वास व दिलेली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडण्याचा मानस असल्याचे  राधेशाम गायकवाड यांनी सांगितले.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article