-->
पणदरेत दारू अड्यावर पोलिसांचा छापा, ४२३४ रुपयांचा माल हस्तगत

पणदरेत दारू अड्यावर पोलिसांचा छापा, ४२३४ रुपयांचा माल हस्तगत

कोऱ्हाळे बु- मौजे पणदरे ता बारामती जि.पुणे गावात छापे टाकुन जप्त करण्यात आलेले देशी विदेशी दारूच्या बाटल्या आणि गावठी हातभट्टीची तयार दारू असा एकुण ४,२३४/- रूपयांचा अवैध दारूचा माल हस्तगत करण्यात आलेला आहे.
        पणदरे गावातील खाली नमुद केलेले इसमांवर कारवाई करून अवैध दारू जप्त करण्यात आलेली आहे. १) कर्वेश चंदर भोसले रा.गितानगर, पणदरे, ता.बारामती, जि.पुणे २) सौ.विजया कर्वेश भोसले, रा.गितानगर, पणदरे, ता.बारामती, जि पुणे. ३) सौ.सोनाली महेश भोसले, रा.गितानगर, पणदरे, ता.बारामती, जि.पुणे. ४) राजेश सतु राखपसरे रा.अशोकनगर पणदरे, ता.बारामती, जि.पुणे. 
         अभिनव देशमुख साहेब, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मिलींद मोहीते साहेब, अपर पोलीस अधीक्षक, बारामती, नारायण शिरगावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग, बारामती, याचे मार्गदर्शनाखाली सोमनाथ लाडे, सहायक पोलीस निरीक्षक, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन, पोलीस उपनिरीक्षक श्रीगणेश कवितके, पोलीस हवालदार महेश पन्हाळे, पोलीस नाईक अनिल खेडकर, पोलीस नाईक कल्याण खांडेकर, पोलीस कॉस्टेबल हिरालाल खोमणे, गणेश लोखंडे, गोपाळ जाधव आणि महिला पोलीस रजनी कांबळे यांचे पथकाने पणदरे सदर कारवाई पार पाडली आहे. 

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article