
बारामती; थोपटेवाडी गावचे प्रथम नागरिक व माळवाडी शाळेचे शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह
Saturday, July 24, 2021
Edit
कोऱ्हाळे बु- बारामती तालुक्यातील थोपटेवाडी गावात आज सकाळी कोरोना कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आतापर्यंत 10 जणांच्या अँटीजेन कोरोना टेस्ट करण्यात आल्या असून यामध्ये गावच्या प्रथम नागरिक सरपंच मॅडम व माळवाडी शाळेचे एक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती डॉ.ठोके यांनी दिली. सदर कॅम्प 3 वाजेपर्यंत चालू अजून कोणाला टेस्ट करायच्या असतील त्यांनी प्राथमिक शाळा सावंतवस्ती येथे आधारकार्ड घेऊन उपस्थित राहावे असे आवाहन डॉ.डोंबाळे मॅडम, देवकाते, नेवसे सिस्टर, सारिका जगताप, हर्षदा चव्हाण यांनी केले आहे.