-->
मोरया गोसावी समाधी मंदिर पाण्याखाली

मोरया गोसावी समाधी मंदिर पाण्याखाली

पुणे : चिंचवड येथील पवना नदीला आज दि . २२ रोजी पुर आला आहे. यामुळे  श्रीमान महासाधू मोरया गोसावी समाधी मंदिर पाण्याखाली आले असल्याची माहीती चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त विनोद पवार यांनी दिली .
                             चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या अधीपत्याखाली  असलेल्या मंदिरांपैकी मोरया गोसावी समाधी  मंदिर  पवना नदी काठी आहे . गेल्या दोन दिवसापासून पावसांच्या संततधारेमुळे व पवना  धरण क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे नदीपात्रात धरणातून   मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग  करण्यात आला आहे . आज पहाटेपासून नदीचा पुर वाढत चालला होता.

      यामुळे  पवना नदीस पुर  आला आहे. आज सकाळी ९ वाजता  श्रीमान महासाधू मोरया गोसावी समाधी मंदिर पाण्याखाली आले आहे . हे पाहण्यासाठी अनेक भावीकांनी व ग्रामस्थांनी गर्दी केली होती . आज सायंकाळी उशीरापर्यंत मंदिर पाण्याखाली होते. या वर्षीची  पावसाळा ऋतू चालु झाल्यापासून  पहील्यांदा मंदिरास पुराच्या पाण्याने जलाभीषेक झाला आहे.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article