-->
काऱ्हाटी येथील हॉटेल मॅनेजरवर हल्ला प्रकरणी १२ जणांवर गुन्हा दाखल

काऱ्हाटी येथील हॉटेल मॅनेजरवर हल्ला प्रकरणी १२ जणांवर गुन्हा दाखल

मोरगाव- बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील मुक्ताई हॉटेलवर हल्ला प्रकरण ताजे असतानाच काल काऱ्हाटी येथील मल्हारराज हॉटेलवर १२ जनांनी मॅनेजरवर हल्ला केला आहे यामध्ये तो जखमी झाला याबाबत वडगाव निंबाळकर पोलिसांनी दोघीजनांवर गुन्हा दाखल केला आहे. 
        स्वप्नील राजेंद्र गायकवाड वय २९ धंदा मॅनेजर(मल्हारराज हाँटेल का-हाटी) रा. मुळ पळसमंडळ ता.माळषिरस जि.सोलापुर हल्ली रा. मल्हारराज हाँटेल काऱ्हाटी ता.बारामती यांनी फिर्याद दिली आहे. 
याबाबत इंद्रजित सोनवणे पुर्ण नाव माहीत नाही. रा. क-हावागज ता.बारामती जि.पुणे व  नितीन खोमणे पुर्ण नाव माहीत नाही.रा. जळगाव क.प ता.बारामती जि.पुणे व इतर १० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. 
        .हकीकत -वर नमुद केले ता.वेऴी व ठिकाणी  यातील आरोपी नं 2 हा त्यांचे समवेत इतर 4 लोकांना सोबत घेवुन सायंकाळी  18.45 वा चे सुमारास फिर्यादीचे मल्हारराज हाँटेलमध्ये आला त्यावेळी हाँटेलमध्ये वेटरचे काम करणारा कुमारपाल यास आम्हाला हाँटेलमध्ये बसु द्या असे आरोपी नं 2 व त्याचे सोबत असणारे 4 लोक वेटर कुमारपाल यास म्हणाले असता त्यावर कुमारपाल याने आम्ही हाँटेलमध्ये जेवायला बसुन देत नाही तुम्हाला जेवन पार्सल घेवुन जा असे म्हणाला असता आरोपी नं 2 व त्याचे सोबत आलेल्या लोकांना म्हणाल्यानंतर त्यांनी कुमारपाल यास  शिवीगाळ दमदाटी करून माझे नाव नितीन खोमणे असुन मी इथलाच राहणारा आहे मी तुमच्याकडे बघुन घेतो असे म्हणुन तेथुन निघुन गेले नंतर आरोपी नं 1 व  2 यांनी रात्रो 20.45 वा चे सुमारास आपल्या सोबत 10 लोकांना घेवुन येवुन हाँटेलचे मेन गेटवरून उड्या मारून हाँटेलमध्ये जबरदस्तीने प्रवेश करून फिर्यादीस तसेच वेटर कुमारपाल यास हाताने व लाथाबुक्याने मारहाण करून हाँटेलमध्ये असना-या  कोल्ड्रींगसच्या बाटल्या तसेच खुर्ची ने मारहाण करून सी.सी.टी.व्ही.कँमेरेची स्क्रीन फिर्यादीचे डोक्यात फोडुन तसेच वेटर कुमारपाल यास  कोल्ड्रींगसच्या बाटली डोक्यात मारून दुखापत करून हाँटेलमध्ये असणा-या खुर्चा तसेच हाँलची काच व खिडक्यांची काच याच्यावर कोल्ड्रींगसच्या बाटल्या व खुर्चा फेकुन मारून नुकसान केले .वगैरे मजकुराचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हायाचा प्रथमवर्ग रिपोर्ट मा.जे.एम.एफ .सी सो,कोर्ट बारामती याच्या कोर्टात रवाना केला असुन गुन्हयाचा पुढील तपास पो हवा  पाटमास  करीत आहेत.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article