-->
बारामती: जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी उद्या राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये जनता दरबाराचे आयोजन

बारामती: जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी उद्या राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये जनता दरबाराचे आयोजन

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सुचनेनुसार उद्या गुरुवार दि.८  रोजी सकाळी १०:०० ते ०१:०० वाजेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस भवन कसबा-बारामती या ठिकाणी जनतेच्या अडचणी शासन दरबारी सोडवण्यासाठी जनता दरबार आयोजित केला असल्याची माहीती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रसिद्धी प्रमुख सुनील बनसोडे यांनी दिली.
 पंचायत समिती, जिल्हा परिषद,मार्केट कमिटी, दूध संघ, खरेदी विक्री संघ, सचिव संस्था, सोमेश्वर, माळेगाव, भवानीनगर कारखाना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, विद्युत वितरण व पुरवठा कमिटीसह पक्ष प्रतिनिधी व सर्व संस्थांचे प्रमुख मान्यवर हे  तालुक्यातील जनतेच्या अडीअडचणी शासन दरबारी सोडविण्यासाठी  उद्या हजर राहणार आहेत विकासकामे,सहकारी संस्था व कामकाज अडचणी व मदतीसाठी  दर गुरुवारी नियोजित केल्या प्रमाणे  तालुका स्तरावरील जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी  या कार्यक्रमाचे आयोजित केले आहे . सदरचा उपक्रम उद्या  गुरुवार दि  ८ रोजी राष्ट्रवादी भवन कसबा बारामती याठिकाणी होणार असल्याची माहिती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रसिद्धी प्रमुख सुनिल बनसोडे यांनी दिली.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article