
बारामती तालुका विद्युत वितरण नियंत्रण समीती सदस्यपदी निलेश केदारी
Wednesday, July 7, 2021
Edit
मोरगांव : उद्योग , उर्जा , व कामगार विभाग मंत्रालय मुंबई यांच्या शासन निर्णय २०१५ नुसार बारामती तालुका विद्युत वितरण नियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे. या समीतीच्या अध्यक्षपदी रवींद्र बाबुराव माने तर सदस्यपदी श्री क्षेत्र मोरगावचे सरपंच निलेश हरीभाऊ केदारी यांची निवड करण्यात आली आहे.
बारामती तालुका विद्युत वितरण समीतीपदी विविध क्षेत्रातील व्यक्तींची नुकतीच निवड करण्यात आली आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री यांच्या सुचनेनुसार अध्यक्ष्यां व्यतीरिक्त ईतर सहा अशासकीय सदस्य निवडण्यात आले आहेत. अध्यक्षपदी खांडज येथील ॲड. रवींद्र बाबुराव माने यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये कार्यकारी अभीयंता, तहसिलदार, सभापती, नगराध्यक्ष आदी अकरा सदस्य आहेत.
विज वितरण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मोरगावचे विद्यमान सरपंच निलेश केदारी यांची सदस्यपदी, तर उद्योगक्षेत्र ग्राहक मध्ये केलेल्या कार्याबद्दल संजय प्रभाकर दुधाळ, कृषी क्षेत्र ग्राहक मध्ये कार्याबद्दल वैभव रघुनाथ बुरुंगले, व्यवसाईक ग्राहक कार्याबद्दल विश्वास मल्हारी मांढरे, घरगुती ग्राहक कार्याबद्दल विश्वास तानाजी आटोळे, विज वितरण क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल सुनिल जयसिंग खलाटे यांची निवड करण्यात आली आहे.