-->
वडगांव-मोरगाव गटात येणाऱ्या प्रत्येक गावांत जाऊन लसीकरणाची आवश्यकता- विश्वास देवकाते

वडगांव-मोरगाव गटात येणाऱ्या प्रत्येक गावांत जाऊन लसीकरणाची आवश्यकता- विश्वास देवकाते

मोरगाव : बारामती तालुक्यातील  मोरगाव वडगांव गटामध्ये येणाऱ्या १९ गावांत जाऊन कोव्हीड लसीकरण घेण्याची मागणी तालुका वैद्यकीय अधीकाऱ्यांकडे  केली असल्याचे प्रतीपादन  जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी केले. जिल्हापरीषद गटातील १९ गावात असणाऱ्या कोरोना रुग्णांची पाहणी व  गावातील विकास कामांचा  आज दि  ९ रोजी त्यांनी  आढावा घेतला.
            मोरगाव जिल्हा परीषद गटातील  मोरगाव, तरडोली, माळवाडी, आंबी, लोणी भापकर, मुर्टी , मोढवे, वडगाव निंबाळकर,  जोगवडी  आदी  १९  गावात जाऊन  कोरोना रुग्णांचा आढावा  माजी जिल्हा परीषद अध्यक्ष्यांनी घेतला.  यावेळी मोरगांव येथे सरपंच निलेश केदारी, ग्रामसेवक मोरेश्वर गाडे, गणेश कुंभार, तर  तरडोली येथे सरपंच नवनाथ जगदाळे, उपसरपंच महेंद्र तांबे, ग्रामपंचायत सदस्य संतोष चौधरी,  पळशीचे दादा माने, वैभव मोरे,  कोतवाल संघटनेचे तालुकाध्यक्ष संतोष खोमणे उपस्थित होते.

          देवकाते यांनी वरील गावांत कोरोना रुग्णांची संख्या, उपाययोजना व  विविध विकास कामांबाबत  सरपंच, ग्रामस्थांशी चर्चा केली.  मोरगांव-वडगाव  गटातील कोरोनाचे समुळ उच्चाटन व्हावे यासाठी  गटात येणाऱ्या प्रत्येक गावांत जाऊन लसीकरणाची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत  तालुका वैद्यकीय अधीकारी मनोज खोमणे यांकडे गावागावात जाऊन  कोव्हीड लसीकरण घेण्याची मागणी केली असल्याचे त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले. तसेच मोरगाव येथील वैद्यकीय अधीकारी अनिल वाघमारे यांनाही याबाबत सुचना केल्या.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article