
बारामती: काटेवाडी येथे कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम संपन्न
Tuesday, July 20, 2021
Edit
बारामती: बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे कृषी जागरूकता आणि कृषी औदयोगिक कार्यानुभव कार्यक्रम उत्साहात सुरू असून श्रमशक्ती कृषी महाविदयालय मालदाड (ता. संगमनेर) येथील, कृषी चे कृषीदूत संकेत दादासो माने यांनी अभ्यास दौरा सुरु असून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जनजागृती केली जात आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न असलेल्या श्रमशक्ती कृषी महाविद्यालयामार्फत कृषिदूत सर्वत्र अभ्यास व मार्गदर्शन दौरे उपक्रम राबिवला जात आहे. या महाविद्यालयाचा कृषीदूत संकेत दादासो माने. याने काटेवाडी येथे कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
गावातील शेतकल्यांना बीज प्रक्रिया करण्याची पद्धत चाऱ्यावरील युरिया प्रक्रिया, माती परिक्षण शेततळे बनवन्याची आधुनिक पदधत व त्यासाठी उपलब्ध योजना, किटकनाशकांचा माहिती व प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाला परिसरातील शेतकयाचा उत्तम प्रतिसाद मिळत असुन शेतकऱ्यांकडून माने यांचे कौतुक होत आहे.
या उपक्रमासाठी श्रमिक उद्योग समूह, सेवा संस्कार संस्थेचे संस्थापक साहेबराव नवले, श्रमशक्ती कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक कडलग, उपप्राचार्य डॉ. अरविंद हारदे । समन्वयक प्रा. निलेश तायडे व कार्यक्रम अधिकारी जयेश धांगडा आदी तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभत आहे.