-->
मोरगाव: अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव येथे श्रावणातील संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने कळस दर्शनासाठी भावीकांची गर्दी

मोरगाव: अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव येथे श्रावणातील संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने कळस दर्शनासाठी भावीकांची गर्दी

मोरगाव : अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव ता. बारामती येथे  आज श्रावणातील संकष्टी  चतुर्थीच्या निमित्ताने भावीकांनी गर्दी केली होती. कोरोनामुळे मंदिर बंद असले तरी  जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून गणेश भक्त श्रींच्या कळश व पायरी दर्शनासाठी येताना आढळून येत होते.

      हिंदू धर्मामध्ये श्रावण महीना पवित्र समजला जात असल्याने तीर्थक्षेत्र ठिकाणी अनेक भक्त दर्शनासाठी जातात . मात्र  राज्य शासनाच्या आदेशानुसार  गतवर्षीप्रमाणे याही वर्षी  अष्टविनायकापैकी प्रथम तीर्थक्षेत्र असलेले मयुरेश्वर मंदिर कोरोनामुळे  खबरदारीचा उपाय म्हणून सर्व  भावीकांना दर्शनासाठी बंद आहे.  मात्र चतुर्थी व श्रावण महीना या दुहेरी योगामुळे अनेक भक्त दर्शनासाठी आले होते.

     आज चतुर्थीच्या निमित्ताने पहाटे गुरव मंडळींची पुजा तर सकाळी सात व दुपारी बारा वाजता पुन्हा पुजा झाली यावेळी श्रींस नैवद्य दाखविण्यात आला. सकाळपासून दुपार पर्यंत भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. चतुर्थीच्या निमित्ताने पेठेतील दुकाने हार दुर्वा, श्रींच्या प्रतीमांनी सजवली होती. येणारे अनेक भक्त कोरोनाचे संकट जाऊन लवकर श्रींचे दर्शन होण्यासाठी मनोमन आराधना करताना आढळत होते. रात्री चंद्रोदयाच्या वेळी  आरती नंतर मयुरेश्वरास महानैवेद्य दाखविण्यात आला 


Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article