-->
फक्त तुम्ही शेती नीट करा; नायतर ह्याचं काय अन त्याचं काय, अन मळ तंबाखू, सगळे दिवस सारखे नसतात, शेतीकडे नीट लक्ष द्या- उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

फक्त तुम्ही शेती नीट करा; नायतर ह्याचं काय अन त्याचं काय, अन मळ तंबाखू, सगळे दिवस सारखे नसतात, शेतीकडे नीट लक्ष द्या- उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते माळेगाव साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरु करण्यात आला. अजित पवारांनी यावेळी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निमित्तानं अजित पवारांनी साखरेचा दर, सहकार, कारखान्यांची स्थिती, पूरस्थिती पाण्याचा प्रश्न यावर भाष्य केलं.

अजित पवारांनी यावेळी मागच्या सरकारनं 5 टीएमसी पाणी दुसरीकडं वळवलं, त्यामुळं आपली वाट लागली असती,असं म्हटलं. आमचं सरकार आल्यावर निर्णय बदलला, असं अजित पवार म्हणाले. यानिमित्तानं त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळातील निर्णयावर टीका केली. रसापासून इथेनॉल बनवण्याचा पर्याय किंवा अन्य पर्याय निवडूयात.

सभासदांना अधिक पैसे मिळतील यावर भर द्यावा लागेल. यंदा साखरेचं उच्चांकी उत्पादन होण्याची शक्यता आहे. अनेक कारखान्यांनी आपली क्षमता वाढवलीय. जायकवाडी धरण भरलंय, उजनी 109 % भरलंय.

मी रोज धरणांची स्थिती काय याची माहिती घेत असतो. सगळी धरणं भरलेली आहेत, आता फक्त तुम्ही नीट शेती करा. नायतर ह्याचं काय अन त्याचं काय, अन मळ तंबाखू, सगळे दिवस सारखे नसतात. शेतीकडे नीट लक्ष द्या, असं अजित पवार म्हणाले.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article