-->
इंदापुर: वाढदिवसाचे अवचित्य साधून युवा सर्कल ग्रुपच्या वतीने गरजूंना कपडे वाटप

इंदापुर: वाढदिवसाचे अवचित्य साधून युवा सर्कल ग्रुपच्या वतीने गरजूंना कपडे वाटप

इंदापूर : युवा सर्कल ग्रुपच्या वतीने काल इंदापूर शहरातील २० गरजू कुटुंबाना कपडे वाटप करण्यात आले.
            युवा सर्कल ग्रुपचे सदस्य मयुर जगताप यांच्या वाढदिवसाचे अवचित साधत युवा सर्कल या ग्रुपने गरजू कुटुंबाना कपड्यांचे वाटप केले, युवा सर्कल ग्रुप गेल्या दोन महिन्यांपासून अन्नदानाचे काम करत आहेत, त्यासोबतच त्यांनी हे देखील कार्य उत्फुर्तेपणे पार पाडले.
            यावेळी सुमित वाघमारे म्हणाले, बऱ्याच मोठ्या घरांतून त्यांची चांगली वापरण्यायोग्य असणारी कपडे फेकून दिले जातात, पण ती टाकून न देता ती आमच्याकडे द्या त्याचा फायदा गरजू व्यक्तींना होईल असे सांगत आम्ही जवळपास ५० ते ६० कपडे गोळा केले. वाढदिवस हे फक्त एक निमित्त आहे या माझ्या गरजू व्यक्तींनी आम्हाला कधीही साद दिली तरी त्यांच्या मदतीला रात्री अपरात्री धावून जाण्याची तयारी आमच्या ग्रुपची आहे, तसेच वाढता कोरोना बघता सर्वांना लसीकरण करून घेण्याची विनंती देखील ग्रुपच्या वतीने केली. कोरोनाला न घाबरता त्याच्यासोबत लढण्याची जिद्द ठेवा असे देखील सांगीतले.
             या वेळी मयुर जगताप, श्रीकांत मखरे, उमेश मखरे, नवाज तांबोळी, स्वप्नील मखरे, विशाल चितारे, विजय मरळे, अविनाश सरवदे, जयराज भोरे व सुमित वाघमारे यांनी उत्फुर्तेपणे सहभाग नोंदवला.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article