
कोऱ्हाळेत मोफत सातबारा वाटप
Saturday, October 2, 2021
Edit
कोऱ्हाळे बु- बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बु सजा गावातील मौजे कोऱ्हाळे बुद्रुक, थोपटेवाडी, माळशिकारेवाडी येथील जमीनधारकांना मोफत सातबारा वाटप करण्यात आले. शासनाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त महसूल विभागामार्फत सुधारित सातबारा वाटप २ ऑक्टोबर रोजी करण्याचे आदेश दिल्याने सातबारा वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच रवींद्र खोमणे, संपादक राजेश वाघ, पोलीस पाटील शरद खोमणे, मोहन भगत, गोविंद गुळूमकर, डि.के खोमणे, महादेव कोकणे, भगवान निकम, बाबू नलवडे, गावकामगार तलाठी प्रल्हाद वाळुंज, कोतवाल बाळू खोमणे उपस्थित होते.