
कुतवळवाडी सोसायटीची वार्षिक सभा खेळीमेळीत
Saturday, October 2, 2021
Edit
सुपे- बारामती तालुक्यातील सुपे येथील कुतवळवाडी विकास सोसायटीची वार्षिक सभा अध्यक्ष श्री जालिंदर कुतवळ यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दिनांक 23/9/2021 रोजी सकाळी 10.30 वाजता संस्था ऑफिस सुपे येथे ऑनलाइन संपन्न झाली. या सभेस संस्थेचे चेअरमन दत्तात्रय बोरकर उपस्थित होते. सचिव श्री. अभिजीत काळखैरे यांनी अजिंठा वरील सर्व विषय वाचून दाखवले व त्यावर विषयावर सखोल चर्चा करण्यात आली. विषय नंबर 1 ते 11 विषयांपैकी मागील सभेचे प्रोसिडिंग थकबाकीदार सभासदांची थकबाकी उपविधी दुरुस्ती आदी सर्व विषयांवर सभेमध्ये चर्चा करून मंजुरी देण्यात आली आहे.
संस्थेचे चेअरमन दत्तात्रय बोरकर यांनी सभासदांना मार्गदर्शन करताना संस्थेचे भाग भांडवल, चालू वर्षी कर्ज वाटप तसेच वसुलीचे शेकडा प्रमाण यात वाढ झाली पाहिजे असे सुचवले.
तसेच सभेचे अध्यक्ष जालिंदर कुतवळ यांनी सभासदांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे सभासदांना समजतील अशा सोप्या भाषेत सांगून त्यांचे समाधान केले व सभा संपली असे जाहीर केले.