-->
तलाठी संघटना बारामती तालुकाध्यक्षपदी रवी कदम तर उपाध्यक्षपदी श्याम झोडगे

तलाठी संघटना बारामती तालुकाध्यक्षपदी रवी कदम तर उपाध्यक्षपदी श्याम झोडगे

मोरगाव :  बारामती तालुका  तलाठी संघटनेची  सर्वसाधारण सभा काल दि .२६ रोजी  मुख्य प्रशासकीय भवन सभागृह बारामती येथे  संपन्न झाली. यामध्ये  बारामती तालुका अध्यक्षपदी रवी कदम तर उपाध्यक्ष पदी श्याम झोडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
बारामती तालुका महसूल ख्यात्याच्या  सर्व मंडल अधिकारी व तलाठी यांची वार्षिक सर्वसाधारण सभा काल बारामती येथे पार पडली. यावेळी तालुक्यातील सर्व तलाठी व मंडलाधीकारी  उपस्थित होते.   सदर सभेत  तलाठी संघटनेची कार्यकारिणी निवडण्यात  आली. यामध्ये  रवि कदम यांची अध्यक्ष तर  मोरगाव मंडल कार्यक्षेत्रात काम करणारे  श्याम झोडगे  यांची  उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली   जावेद मुलानी यांची कार्याध्यक्ष तर  गजानन पारवे - सचिव पदी निवड करण्यात आली. 

 यानिवडीनंतर  तरडोली ग्रामपंचायतीच्या वतीने सोमेश्र्वर सहकारी  साखर कारखाना संचालक किसन तांबे ,  सरपंच नवनाथ जगदाळे, उपसरपंच महेंद्र तांबे , पुणे जिल्हा परीषद जल व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष हनुमंत भापकर यांनी त्यांचा सत्कार केला. निवडीनंतर  निरा-बारामती वार्ताशी  बोलताना श्याम झोडगे यांनी सांगितले की तलाठ्याना मिळणारा  सादिल भत्ता (स्टेशनरी अलाउंस) पूर्वी शंभर रुपये. होता तो तलाठी यांना  1000  तर  मंडल अधीकारी यांना  1500 याप्रमाणे मिळावा. जुनी पेंशन योजना लागू करणेसाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article