-->
बारामती: चंदनाची विक्री करणाऱ्या आरोपींना माळेगाव पोलिसांनी केले गजाआड

बारामती: चंदनाची विक्री करणाऱ्या आरोपींना माळेगाव पोलिसांनी केले गजाआड

बारामती -माळेगाव पोलिसांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई  करत चंदन विक्री करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी सचिन दीक्षित भोसले (वय २८ वर्ष) (रा.राजवाड्याच्या पाठीमागे माळेगाव ब्रू ता बारामती, पुणे), ऋषिकेश सुदाम पवार (वय १९ वर्ष) (रा.लोणकर वस्ती माळेगाव), राजेंद्र लक्ष्मण कुचेकर (वय २५ वर्ष) (रा.नागथली माळेगाव) असे ताब्यात घेण्यात आल्याचे नाव आहे.
         मिळालेल्या माहिती नुसार सचिन भोसले हा माळेगाव खुर्द रोड येथे पाण्याच्या टाकी जवळ चंदन विक्रीसाठी घेऊन थांबला आहे. अशी गुप्त माहिती माळेगाव चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांना मिळाली.  सदर माहिती मिळताच लगेचच घुगे व सोबत पोलीस हवालदार शाशिकांत वाघ, पोलीस नाईक दत्तात्रेय चांदणे, पोलीस शिपाई प्रशांत राऊत , दीपक दराडे यांनी सदर ठिकाणी  छापा टाकून आरोपीस ताब्यात घेतले. दरम्यान त्याच्याकडून ४८ किलो ४०० ग्रॅम वजनाचे अंदाजे किंमत १७ हजार रुपयांचा कच्चे चंदन मिळून आले असून सदर आरोपीना पुढील कारवाई करिता वन परीक्षेत्र अधिकारी बारामती वन विभाग यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 
         सदरची कामगीरी बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राहुल घुगे, पोलीस हवालदार शाशिकांत वाघ, पोलीस नाईक दत्तात्रेय चांदणे, पोलीस शिपाई प्रशांत राऊत, दीपक दराडे यांनी केली आहे.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article