
थोपटेवाडीची ग्रामसभा वादावादीत,सरपंचाचे सभेतून पलायन
Friday, October 29, 2021
Edit
कोऱ्हाळे बु- बारामती तालुक्यातील वादावादीत प्रसिद्ध असलेल्या थोपटेवाडी ग्रामपंचायतीची ग्रामसभा होत असताना सभेतून सरपंच रेखा बनकर यांनी पलायन केल्याने अर्धवट ग्रामसभा पार पडल्याने ग्रामस्थ वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे.
कोरोना संसर्गमुळे गेली 2 वर्ष ग्रामसभा रखडली होती. संसर्ग कमी झाल्याने शासनाच्या नियमाप्रमाणे थोपटेवाडी ग्रामपंचायतीने भैरवनाथ मंदिरात सरपंच रेखा बनकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन सकाळी 10 वाजता केले होते. परंतु सरपंच व ग्रामसेवक 11 वस्ता आल्याने उशिरा ग्रामसभा सूरवात झाली.
विषय क्रमांक एक ते अकरा वाचून कसे तरी पार पडले. मध्येच विरोधकांनी चार-पाच निवेदन दिल्याने विषयांतर होऊन गदारोळ होण्याची चिन्हे दिसू लागताच सरपंच रेखा बनकर अर्धवट सोडून निघून गेल्याने सभा अर्ध्यावर झाली.
यासंदर्भात गटविकास अधिकारी विनायक बागल यांच्याशी संपर्क साधला असता पण पुन्हा विशेष ग्रामसभा घेतली जाईल. असे बागल यांनी सांगितले.