
बारामती: कराटे ब्लॅक बेल्ट स्पर्धेत पल्लव जगताप अथर्व बुनगे प्रथम
Sunday, October 31, 2021
Edit
सोमेश्वर : वानेवाडी (ता बारामती) येथील ज्युदो कराटे किक बॉक्सिंग मार्शल आर्टच्या वतीने विविध बेल्टसाठी आयोजित केलेल्या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला या स्पर्धेत मुलांमध्ये पल्लव जगताप व अथर्व बुनगे यांनी ब्लॅक बेल्ट मध्ये क्रमांक पटकावला वानेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेचे उद्घाटन बारामती तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मा. अध्यक्ष विक्रम भोसले तसेच दत्तात्रय बुनगे संस्थेचे चिफ मास्टर धनंजय भोसले अशोक भोसले दुष्यात चव्हाण आदी उपस्थित होते तीन दिवस चाललेल्या स्पर्धेत कराटे किक बॉक्सिंग फाईट नान- चाक तलवारबाजी लाठी काठी योगा सूर्यनमस्कार प्रणायम याचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले स्पर्धेतील विजेते स्पर्धक पुढील प्रमाणे
यलो बेल्ट: माहेश्वरी होळकर सागर हाके धीरज दोडमिसे युवराज होळकर विराज सावंत
ऑरेंज बेल्ट: श्वेत पाटील गणेश होळकर
ग्रीन बेल्ट मुली: सायली गौडगाय श्रावणी खांडेकर संजिदा जगताप सानवी भोसले
ग्रीन बेल्ट मुले : कृष्णा कात्रजकर दिग्विजय कर्चे अजिंक्य कापरे युगांत खरात अनुज गजे
ब्ल्यू बेल्ट: यशस्वी भोसले मयुरेश भोसले
पर्पल बेल्ट सेकंड: सोनाक्षी जेधे कार्तिकी पवार दुर्गा भोसले अविनाश गायकवाड
ब्राऊन बेल्ट सेकंड: ओजस निगडे रुद्र कोकरे वैष्णवी जाधव
ब्लॅक बेल्ट: पल्लव जगताप अथर्व बुनगे या विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकावला यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले संस्थेचे ग्रँड मास्टर प्रकाश रासकर यांनी स्पर्धेचे आयोजन केले होते ब्लॅक बेस्ट मास्टर मोनिका गाढवे चंद्रकांत सोनवणे सोहम दिवेकर शौनक महानवर पृथ्वीराज परकाळे चैतन्य कुंभार शुभम कांबळे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले