-->
बारामती: पोलीस-पत्रकार क्रिकेट सामन्यात पोलीस संघाची पत्रकार संघावर मात

बारामती: पोलीस-पत्रकार क्रिकेट सामन्यात पोलीस संघाची पत्रकार संघावर मात

आज वडगाव निंबाळकर पोलीस संघ आणि बारामती तालुका पत्रकार संघात मु सा काकडे महाविद्यालय मैदानावर पार पडलेल्या क्रिकेट सामन्यात पत्रकार संघाचे ६६ धावांचे आव्हान पोलीस संघाने दोन षटके राखून पूर्ण करत विजय संपादन केला. 
        वडगांव निंबाळकर पोलिस आणि बारामती ग्रामीण पत्रकार संघाचा पाच वर्षांपूर्वी सुसंवाद घडावा यादृष्टीने पोलिस पत्रकार सामने पाच वर्षांपूर्वी सुरू केले. आज पाचव्या सामन्यात पोलिस संघाचे कर्णधार सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे व पत्रकार संघाचे कर्णधार महेश जगताप यांच्या यांच्या नेतृत्वाखाली संघ मैदानात उतरले. पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पत्रकारांनी दहा षटकांमध्ये 66 धावांचे आव्हान उभे केले. पोलिसांनी सहज फलंदाजी करताना आठ षटकात विजय प्राप्त केला. दुसर्‍या सामन्यात पोलिसांच्या संघाने शंभरपेक्षा अधिक धावांचे आव्हान उभे केले पत्रकार संघ हे आव्हान पेलू शकला नाही मात्र त्यांनी चांगली लढत दिली. मॅन ऑफ द मॅच हा किताब उत्कृष्ट झेल घेऊन सामना फिरविणारे तुषार जैनक यांना देण्यात आला. 
             सोमेश्वर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांच्या हस्ते विजयी संघाला चषक प्रदान करण्यात आला. याप्रसंगी फौजदार योगेश शेलार, सलीम शेख, श्रीगणेश कवितके, ज्ञानेश्वर सानप, नितीन बोराडे, अक्षय सिताप, भाऊसाहेब मारकड, चौधरी, साळवे, पत्रकार दत्ता माळशिकारे, गणेश आळंदीकर, संतोष शेंडकर, वसंत मोरे, चिंतामणी क्षीरसागर, युवराज खोमणे, हेमंत गडकरी, विनोद गोलांडे, काशिनाथ पिंगळे, अमर वाघ, सचिन वाघ, सुनील जाधव, तुषार धुमाळ, सचिन पवार  उपस्थित होते. निवेदक म्हणून मनोहर तावरे यांनी भूमिका बजावली.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article