-->
मराठी पत्रकार परिषदेच्या 44 व्या राष्ट्रीय पत्रकार अधिवेशनाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन

मराठी पत्रकार परिषदेच्या 44 व्या राष्ट्रीय पत्रकार अधिवेशनाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन

बारामती -  मराठी पत्रकार परिषदेच्या 44 व्या राष्ट्रीय पत्रकार अधिवेशनाला माजी कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार असून अधिवेशनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.
   मराठी पत्रकार परिषदेचे 44 वे राष्ट्रीय अधिवेशन पुणे जिल्ह्यातील उरळीकांचन या ठिकाणी डिसेंबर महिन्यात पार पडणार आहे. देश व राज्यभरातील सुमारे दोन हजाराहून अधिक पत्रकार बांधव या दोन दिवसीय अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. 
    मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मराठी पत्रकार परिषदेच्या शिष्टमंडळाने आज बारामती येथील गोविंदबाग या शरद पवार यांच्या निवासस्थानी पवार यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळातील सदस्यांशी पवारांनी अधिवेशना बाबत सविस्तर चर्चा केली अधिवेशनाला उपस्थित राहण्याबाबत अनुकूलता दर्शवली.
     यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, कार्याध्यक्ष शरद पाबळे, समन्वयक सुनील जगताप, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, सोशल मीडिया चे जिल्हाध्यक्ष जनार्दन दांडगे, बारामती तालुका मराठी  पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत गडकरी व यजमान हवेली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र काळभोर उपस्थित होते.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article