
वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल ४६० जणांवर कारवाई करत पोलिसांनी १ लाख ३८ हजार ५०० रुपयांचा आकारला दंड
Tuesday, December 14, 2021
Edit
कोऱ्हाळे बु - दि.०६/१२/२०२१ ते दि. १२/१२/२०२१ रोजी पर्यंतची वाहतुक केसेसची कारवाई वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन अंतर्गत करंजेपुल दुरक्षेत्र, सुपा सुरक्षेत्र, मोरगांव मदत केंद्र व पणदरे दुरक्षेत्र हृददीत लोकांनी वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांचेवर कारवाई करुन १३८५०० रुपयांचा दंड आकारण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई हि पोलीस अधिक्षक मा. डॉ. अभिनव देशमुख सो पुणे ग्रामीण, अप्पर पोलीस अधिक्षक सो मा. श्री. मिलींद मोहीते सो बारामती विभाग बारामती तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. गणेश इंगळे सो बारामती उपविभाग वारामती यांचे मार्गदर्शनाखाली वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक श्री सोमनाथ लांडे, पोलीस उपनिरीक्षक श्रीगणेश कवितके, पोलीस उपनिरीक्षक योगश शेलार, पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख , पो . हवा पवार, पो. ना. पानसरे, जाधव, साळवे, जावीर यांनी केली.
वरील प्रमाणे वाहतुक केसेसच्या दंडामध्ये वाढ झालेली असुन यापुढे नागरीकांनी वातुकीच्या नियमाचे पालन करावे अन्यथा नवीन नियमावली नुसार कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.