
श्री सोमेश्वर कामगार पतपेढीच्या निवडणुकीत पतंगाची भरारी
Monday, December 13, 2021
Edit
सोमेश्वरनगर - श्री सोमेश्वर कामगार पतपेढीच्या सन २०२१-२०२२ ते २०२६-२०२७ या कालावधीकरीता दि.१२/१२/२०२१ रोजी झालेल्या निवडणूकीमध्ये श्री सोमेश्वर कामगार विकास पॅनेलच्या पतंगाने भरारी मारत श्री सोमेश्वर कामगार परिवर्तन पॅनेलच्या कपबशीचा ११/२ अशा फरकाने मोठा पराभव करुन संस्थेवर निर्विवाद वर्चस्व कायम ठेवले.
या निवडणूकीमध्ये श्री सोमेश्वर कामगार विकास पॅनलचे उमेदवार ७५ मतांनी विजयी झालेले आहेत. श्री सोमेश्वर कामगार विकास पॅनेलचे राहुल सोरटे, हनुमंत भापकर, उज्वल पवार, अजित शिंदे, राहुल खलाटे, विशाल मगर, जालिंदर शेंडकर, मच्छिंद्र गवळी, जयकुमार भोसले, संजय लकडे, जगन्नाथ बनसोडे हे उमेदवार विजयी झाले आहेत. तसेच श्री सोमेश्वर कामगार विकास पॅनेलच्या जयश्री घावरी यांची महिला राखीव प्रवर्गामधून यापुर्वीच बिनविरोध निवड झालेली आहे.
श्री सोमेश्वर कामगार विकास पॅनेलच्या विजयासाठी पॅनेलचे प्रमुख बाळासाहेब काकडे, विलास दानवले, बाळासाहेब गायकवाड, धनंजय खोमणे, तानाजीराव सोरटे, कैलास जगताप, पंढरीनाथ राऊत, भरत लकडे व संतोष भोसले यांनी अथक परिश्रम घेतले. विजयी सभेवेळी श्री.बाळासाहेब काकडे, बाळासाहेब गायकवाड व धनंजय खोमणे यांनी सांगितले की, ही लढत “धनशक्ती विरुद्ध जनशक्ती” अशी झालेली असून सर्व सभासद कामगार बंधू यांनी आजपर्यंत केलेल्या कामकाजावर विश्वास ठेवून श्री सोमेश्वर कामगार विकास पॅनेलच्या सर्व उमेदवारांना मोठ्या फरकाने विजयी केले त्याबद्दल सर्व सभासद कामगार बंधूचे आभार मानले. या निवडणूकीचे मतमोजणी दरम्यान पॅनेलच्या वतीने प्रतिनिधी म्हणून विलास दानवले व प्रविण भोईटे हे उपस्थित होते. तसेच यानिवडणूकीचे निवडणूक निर्णयअधिकारी म्हणून आर.ए.देवकाते यांनी कामकाज पाहीले.