
सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या आदल्या दिवशी चोरीला गेलेला खिल्लारी खोंड पकडण्यात वडगांव निंबाळकर पोलिसांना यश, चोरीच्या गुन्ह्याचा ७ तासात लावला छडा, चाकण येथून ३ आरोपी ताब्यात
Friday, December 17, 2021
Edit
पणदरे - दि 13/12/2021 रोजी पहाटे 05:00 वा ते सायं 5:00 दरम्यान फिर्यादी रमेश रामा करगळ यांचे राहते घरासमोर, कोपीसमोर बांधलेले खिलार जातीचे खोंड म्हसोबाचीवाडी मानाजीनगर ता.बारामती जि.पुणे येथून कोणीतरी अज्ञात चोरट्याने लबाडीचे इराद्याने स्वतःचे फायद्याकरीता फिर्यादीचे संमतीशिवाय चोरी करुन चोरुन नेले आहे म्हणुन त्यांची अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी सूत्र हालवत ७ तासांत गुन्ह्याचा छडा लावला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर गुन्ह्यातील ३ आरोपींना पकडण्यात वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनला यश आले असून सदर आरोपी यांना चाकण येथुन अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई मा.सोमनाथ लांडे वडगाव सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्री गणेश कवितके पोलीस उपनिरीक्षक, पोलीस नाईक हिरालाल खोमणे, पोलीस नाईक दादासाहेब डोईफोडे, पोलीस नाईक गोपाळ जाधव यांनी केली आहे.
पुढील तपास पो.ना खोमणे हे करीत आहेत.