
मांडकीत मानसिंग तात्या जगताप यांच्या पॅनेलला मतदान करण्याचे अवाहन
Thursday, December 16, 2021
Edit
निरा- पुरंदर तालुक्यातील मांडकी येथील ज्योतिर्लिंग विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक मानसिंग तात्या जगताप यांच्या श्री ज्योतिर्लिंग, भैरवनाथ, धुळदेव सहकार विकास पॅनेलचे पारडे जड असल्याने फक्त कपबशी या चित्रावर शिक्का मारून पॅनेल विजयी करावे असे आवाहन पॅनल प्रमुख अशोक शिंदे, विजय साळुंखे, रविंद्र सणस, शिवराम जगताप, हनुमंत किन्हाळे, नरसिंग जगताप यांनी केले आहे.
संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 13 जागांसाठी दिनांक 18 रोजी मतदान होत आहे. आमच्या पॅनेलचे एकनाथ बुनगे बिनविरोध झाले आहेत.
संस्था स्थापनेपासून संस्थेचा पारदर्शक व्यवहार करून दैनंदिन खर्चात काटकसर करत स्वमालकीची 3 गुंठे जागा घेऊन जागेत प्रशस्त इमारत व गाळे बांधले आहेत. तसेच दरवर्षी लाभांश दिला जातो. तरीही विरोधकांनी केवळ विरोधासाठी पॅनेल उभे केले आहे. त्यांच्या भूलथापांना व आर्थिक आमिशाला बळी न पडता पॅनेलच्या 12 ही उमेदवारांच्या कपबशी या चित्रावर शिक्का मारा