
मोरया गोसावी संजीवनी समाधी सोहळ्यास सुरुवात
Wednesday, December 22, 2021
Edit
पुणे: श्रीमन् महासाधू मोरया गोसावी संजीवनी समाधी सोहळा मंगळवार दि २१ ते शनिवार दि २५ या दरम्यान चिंचवड येथे संपन्न होणार आहे. सोहळ्याचे हे ४६० वे वर्ष आहे. यानिमित्ताने महापुजा, होम हवन, शिबीर, मनोरंजनपर कार्यक्रम आयोजित केला जाणार असून यावर्षीचा दिला जाणारा श्रीमन् महासाधू मोरया गोसावी जीवनगौरव पुरस्कार बारामती टेक्सटाइल पार्कच्या अध्यक्षा सुनैत्रा अजित पवार यांना दिला जाणार आहे.
चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी चिंचवड महानगर पालीका व ग्रामस्थांच्या वतीने संजीवनी समाधी सोहळा चिंचवड येथे साजरा केला जातो. या महोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी समाजातील असामान्य कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला देवस्थानच्यावतीने जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येते. याबाबत चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार जगन्नाथ देव, विनोद पोपटराव पवार, विश्राम भालचंद्र देव, आनंद विश्वनाथ तांबे, राजेंद्र बाबुराव उमाप यांची बैठक नुकतीच संपन्न झाली. यामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजनाबाबत चर्चा करण्यात आली.
सुन्नेत्रा पवार यांनी बारामती टेक्सटाइल पार्क मार्फत हजारो महीलांना रोजगार उपलब्ध करुन देऊन महीला सबलीकरणासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. ईव्हायरमेंट ऑफ फोरमच्या माध्यमातून आज अखेर पाच लाखपेक्षा अधीक वृक्षलागवड व संवर्धनाचे कार्य केले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात वन्य प्राण्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबण्यासाठी बारामती, दौंड, ईंदापुर आदी तालुक्यातील राखीव वनक्षेत्र, अभयारण्यात पाणवठे तयार केले, टॅंकरद्वारे पाणी पुरवठ्याचे विशेष कार्य केले आहे. तर समाजातील बारा हजार पेक्षा अधीक गोरगरीब रुग्णांवर काचबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यासह शैक्षणिक, सामाजिक अशी असंख्य समाजाभिमुख कामे त्यांनी केली आहेत.
यामुळे विश्वस्त मंडळाने समाधी दिनाच्या पुर्व संधेस शुक्रवार दि. २४ रोजी यावर्षीचा श्रीमन् महासाधू मोरया गोसावी जीवनगौरव पुरस्कार सुन्नेत्रा पवार यांना देण्याचे ठरविले आहे. हा कार्यक्रम सायंकाळी ६ ते ८ वेळेत संपन्न होणार आहे. या पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी विविध मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहीती विश्वस्त विनोद पवार यांनी दिली.