-->
कोऱ्हाळे बु येथे सोन्या बापू खोमणे युवा मंचाच्या वतीने उद्या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

कोऱ्हाळे बु येथे सोन्या बापू खोमणे युवा मंचाच्या वतीने उद्या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

बारामती: बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बु ग्रामपंचायतीचे सरपंच रविंद्र खोमणे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या रविवार दि.२६ रोजी सोन्या बापू खोमणे युवा मंचाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
      कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे अजूनही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, येणाऱ्या काळात रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून  भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 
      तरी पंचक्रोशीतील ज्या नागरिकांना रक्तदान करायचे आहे त्यांनी रविवारी सकाळी ९.३० वाजता ग्रामपंचायत कार्यालय कोऱ्हाळे बु  येथे हजर राहण्याचे अवाहन मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आले आहे.

Related Posts

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article