-->
साठ वर्षांनी पहिल्यांदाच वार्षिक स्नेहसंमेलन भरवत गुरुजींनी नादच केला थेट

साठ वर्षांनी पहिल्यांदाच वार्षिक स्नेहसंमेलन भरवत गुरुजींनी नादच केला थेट

प्रतिनिधी - सुनील जाधव

वडगाव निंबाळकर-   बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर गावातील जि. प. प्रा.शाळा किंगरे -परांडे मळा येथे दिनांक 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रथमच स्नेहसंमेलन कार्यक्रम पार पडला.

          यावेळी वडगाव निंबाळकर परिसरातील सर्व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. यावेळी वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे सोमनाथ लांडे साहेब, ज्ञानेश्वर सानप, सभापती प्रदीप बापू धापटे,सरपंच सुनील ढोले ग्रामपंचायत सदस्य सीमा राऊत,लता परांडे,संतोष दरेकर,  यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष पद भूषवले. या कार्यक्रमाचे नियोजन दत्तात्रय भोसले सर,दलिचंद संचेती सर यांनी केले, यावेळी आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार श्रीमती रुक्मिणी पेटकर, व गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला. शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना व स्पर्धकांना श्री शिवछत्रपती प्रतिष्ठान तर्फे सन्मानचिन्ह व य गौरव करण्यात आला. तसेच पप्पू शेठ गायकवाड लक्षा ग्रुप सर्व बैलगाडा प्रेमींनी खाऊवाटप केले. व राजेश्वरराजे राजेनिंबाळकर यांच्या तर्फे फॅन,लाईट ट्यूब देण्यात आले. तसेच बारामती तालुक्यातील सुप्रसिद्ध राजापुरी भेळ पाणीपुरी स्टॉल लावण्यात आला यावेळी विद्यार्थी व पालकांनी यांचा आस्वाद घेतला. 
              सोमनाथ लांडे साहेब यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व  शाळेतील शिक्षकांचे भरभरून कौतुक केले व शब्बास की ची थाप दिली. यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील जाधव, सचिन गायकवाड मित्रपरिवार यांनी केलं. विद्यार्थ्यांनी आपली कला दाखवत प्रेक्षकांचे मन जिंकले या वेळी टाळ्या व बक्षीस यांचा वर्षाव करण्यात आला. 
           यावेळी उपस्थिती शिवाजी पांडुरंग गायकवाड, उज्वल पवार, स्वाती गायकवाड,अमर साळुंखे, अमृत दरेकर, यशवंत देवकर, संदीप साळुंके,भूषण दरेकर, भारत साळुंके,संदीप गायकवाड,अक्षय गायकवाड,सागर पापळ,किरण परांडे,ऋषी साळुंके,अनिल जाधव,सोनू राऊत, वैभव शिंदे, संतोष पवार,अंकुश गायकवाड,अण्णा भोसले या सर्वांनी  कार्यक्रमास मोलाची साथ दिली कार्यक्रम आनंदात  पार पडला.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article