-->
पुणे जिल्हा बॅंकेच्या मतदारांना अवाहन

पुणे जिल्हा बॅंकेच्या मतदारांना अवाहन

         आपली बँक | आपला विजय || 
राज्यात अग्रगण्य शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दि.२/१/२०२२ रोजी मतदान होत आहे. सदर निवडणुकीत संचालक पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांचा एकनिष्ठ एकमेव उमेदवार मी श्री राजेश रामचंद्र वाघ क वर्ग नागरी बँका व पतसंस्था या मतदार संघातून निवडणूक लढवत आहे.
     माझ्या ४ पिढ्या माननीय शरद पवार साहेबांचे काम करत असल्याने यापूर्वी पंचायत समिती, बारामती सदस्य पदासाठी उमेदवारी मागितली होती त्यावेळी स्वतः पवार साहेबांनी माझी माळेगाव साखर कारखान्यावर मुलाखत घेतली होती. तसेच पुणे जिल्हा बँकेसाठी २ वेळा अजितदादा पवार यांच्या पॅनलकडून उमेदवारी मागितली होती. त्यावेळी अजितदादांनी थोडे थांबा अशा सूचना दिल्याने मी बिनशर्त माघार घेतली होती. यावेळेस माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विचार होईल अशी १००% खात्री होती. तरीही सहकार पॅनेलने मला जाणून बुजून डावलले असले तरी माझा कोणत्याही प्रकारचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विरोध नाही. तरी माननीय शरद पवार साहेब यांचा एकनिष्ठ एकमेव उमेदवार म्हणून मी राजेश रामचंद्र वाघ यांच्या संभाव्य पतंग या चित्रावर शिक्का मारून पुणे जिल्ह्यातील पतसंस्थाचे प्रश्न सोडवण्यासाठी पत्रकारांचा प्रतिनिधी म्हणून विजयी करावे ही कळकळीची नम्र विनंती. 
          आपला विश्वासू
     राजेश रामचंद्र वाघ 
    चेअरमन- अरविंदादा ग्रामीण बिगर शेती सहकारी     पतसंस्था मर्यादित, थोपटेवाडी ता.बारामती 
संपादक - साप्ताहिक निरा-बारामती वार्ता, कोऱ्हाळे बु|| 

 प्रकाशक - रामचंद्र तावरे-जेष्ठ पत्रकार
Adv. संतोष साबळे- उद्योजक, पुणे

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article