-->
खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांना कोरोनाची लागण, जयंत पाटील यांच्या मुलाच्या लग्नात उपस्थिती लावल्याने संपर्कात आलेल्यांची संख्या जास्त असण्याची शक्यता

खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांना कोरोनाची लागण, जयंत पाटील यांच्या मुलाच्या लग्नात उपस्थिती लावल्याने संपर्कात आलेल्यांची संख्या जास्त असण्याची शक्यता

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही कोरोनाची लागण (Supriya Sule Corona Positive) झाली असल्याची माहिती मिळाली आहे. सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे (Sadanand Sule Corona Positive) यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

    राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. आता आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही कोरोनाची लागण (Supriya Sule Corona Positive) झाली असल्याची माहिती मिळाली आहे. सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे (Sadanand Sule Corona Positive) यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी याविषयी ट्विट (Supriya Sule Tweet) करुन माहिती दिली आहे.

      आपल्या ट्विटमध्ये सुप्रिया सुळे म्हणतात, "मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी,ही नम्र विनंती. काळजी घ्या".

      राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मुलाच्या लग्नात त्याचबरोबर निहार ठाकरे आणि अंकिता पाटील यांच्या लग्नातही सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे त्या अनेकांच्या संपर्कात आल्या असल्याची शक्यता आहे.


Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article