
काळखैरेवाडी गावच्या ग्रामदैवत मिरवणुकीत विनापरवाना वाद्य वाजविल्याने वडगांव निंबाळकर पोलिसांची कारवाई; डी.जे वाहनास परिवहन अधिकाऱ्यांनी आकारला १ लाख ८ हजारांचा दंड
Tuesday, December 28, 2021
Edit
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत मौजे काळखैरेवाडी गावचे हद्दीत ग्रामदैवत मिरवणुकीत विनापरवाना वाद्य वाजविले वरून वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन कडून टाटा कंपनीच्या मॉडीफाईड वाहन क्रमांक MH 12 AU 3059 या वाहनाची तपासणी होऊन कायदेशीर कारवाई साठी मा.प्रादेशिक परिवहन अधिकारी बारामती यांचेकडे अहवाल सादर करणेत आलेला होता.
त्या अनुषंगाने श्री.नंदकिशोर पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, बारामती यांनी सदर वाहनाची तपासणी केलेनंतर त्रुटी आढळलेने मॉडीफाईड डी.जे वाहनास ०१,०८,०००/- रुपये (अक्षरी रु एक लाख आठ हजार रु) दंड करणेत आलेला आहे.
सदरची कारवाई सपोनि सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख यांनी केलेली आहे.