
सोमेश्वर कामगार पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अजित शिंदे तर उपाध्यक्षपदी संजय लकडे
Tuesday, December 28, 2021
Edit
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना कामगार परसंस्थेच्या अध्यक्षपदी अजित श्रीकांत शिंदे यांची तर उपाध्यक्षपदी संजय मारुती लकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
आज संचालक मंडळाच्या मासिक सभेत अध्यक्षपदासाठी शिंदे यांचा तर उपाध्यक्षपदासाठी लकडे यांचा एकमेव अर्ज आल्याने ही निवड करण्यात आली. उपस्थित बाळासाहेब काकडे, बाळासाहेब गायकवाड, तानाजी सोरटे, धनंजय खोमणे, संतोष भोसले, विलास दानवले माजी अध्यक्ष पंढरीनाथ राऊत उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजेंद्र देवकाते यांनी काम पाहिले.