-->
पुणे जिल्ह्यात वर्षभरात २ हजार पेक्षा जास्त नागरिकांना सर्पदंश; सर्वाधिक घटना बारामती मध्ये

पुणे जिल्ह्यात वर्षभरात २ हजार पेक्षा जास्त नागरिकांना सर्पदंश; सर्वाधिक घटना बारामती मध्ये

पुणे : पुणे जिल्ह्यात मागील वर्षात २ हजार हुन अधिक जणांना सर्पदंश झाला आहे. या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून यामध्ये बारामती तालुक्यात सर्वाधिक ३३९ आणि भोर तालुक्यात २८८ सर्पदंशाच्या घटना घडल्या आहेत. वेल्हा तालुक्यात सर्वात कमी ४९ घटना घडल्या. शेतातील कामे, जनावरांना चाराकापणी आणि गुराखी यांचा यामध्ये सर्वाधिक समावेश आहे.

पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये या घटनांमध्ये वाढ दिसून येते

जिल्ह्यामध्ये शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात सर्पदंशाच्या  अधिक घटना आहेत. पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये या घटनांमध्ये भरपूर वाढ झाल्याचे पाहायला मिळते. मुळशी, मावळ, वेल्हे यांसह अन्य तालुक्यांमध्ये भातलावणी मोठ्या प्रमाणात होते. तसेच, बारामती, इंदापूर, भोर, शिरूर या भागांत बागायती शेतीही केली जाते. त्यामुळे याठिकाणी सर्पदंशाच्या घटना अधिक घडल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

दिरंगाई अनेकदा रुग्णाच्या जिवावरही बेतते

दरम्यान मागील वर्षापेक्षा सर्पदंशाचे प्रमाण वाढले असून यास आपल्याकडे असणारी भौगोलिक परिस्थिती. जिल्ह्यात डोंगराळ भाग आदिक असल्याने येथे सापांचे वास्तव्य अधिक दिसून येते. परिणामी सर्पदंशाच्या घटनामध्ये वाढ होते. अशावेळी रुग्णास तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध ना झाल्याने रुग्ण दगावण्याचा धोका अधिक असतो. तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्पदंश झाल्यानंतर वैद्यकीय उपचार घेण्याआधी तंत्रमंत्राच्या साहाय्याने त्याचा उतारा करण्याकडेही अनेकांचा कल असतो. अंधश्रद्धांमध्ये अडकलेल्या या आजारावर औषधे उपलब्ध असली तरी उपचारांमध्ये दिरंगाई केली जाते. ही दिरंगाई अनेकदा रुग्णाच्या जिवावरही बेतते.

२०२१ या वर्षामध्ये पुन्हा सर्पदंशाच्या घटना वाढल्या

गाई-म्हशींचा गोठा, अडगळीची ठिकाणे तसेच मुले घटना घराबाहेर खेळत असताना अडगळीच्या ठिकाणी जातात. त्यावेळी सर्पदंश झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जिल्ह्यात दरवर्षी सर्पदंशाची संख्या वाढत चालली आहे. २०१५ मध्ये जिल्ह्यात १ हजार ६५५ सर्पदंशाच्या घटना घडल्या होत्या. २०१६ मध्ये १ हजार ८३०, २०१७ मध्ये ही संख्या खूप कमी झाली. मात्र, २०२१ मध्ये पुन्हा सर्पदंशाच्या घटना वाढल्या आहेत.

जनजागृती करणे अत्यंत महत्वाचे

ग्रामीण भागात दिवसेंदिवस सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत असल्याने याबाबतीत अधिक सजगता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. सर्पाचा अधिवास संपल्याने साप घराच्या परिसरात दिसण्याच्या आणि त्याचा दंश होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात. त्यामुळे सर्पदंश आणि त्यासंबंधी घ्यावयाची काळजी यासंदर्भात जनजागृती करणे महत्वाचे आहे. 


Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article