
बारामती: सोन्या बापू खोमणे युवा मंच आयोजित रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; शिबिरात १५४ बाटल्या रक्त संकलित
Monday, December 27, 2021
Edit
कोऱ्हाळे बु- बारामती तालुक्यातील को-हाळे बुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच रवींद्र खोमणे यांच्या वाढदिवसानिमित्त सोन्या बापू खोमणे युवा मंचाच्या वतीने व अक्षय ब्लड बँक, पुणे यांच्या सहकार्याने भव्य असे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिरामध्ये अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिरामध्ये विशेष म्हणजे महिलांनी ही रक्तदान केले. पती-पत्नी तसेच वडील-मुलगा यांनी या रक्तदानात सहभाग घेऊन त्यांनी एक वेगळा असा आदर्श निर्माण करून दिला. या शिबिरात एकूण १५४ जणांनी रक्तदान केले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी (नाना) होळकर, तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश मामा खोमणे, संचालक सुनील तात्या भगत, रणजित मोरे, वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनचे एपीआय सोमनाथ लांडे साहेब, दूध संघाचे चेअरमन संदीप जगताप पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज खोमणे, युवा नेते गौतम भैय्या काकडे, किशोर (पप्पू) मासाळ, उपसरपंच लताताई नलवडे, मार्केट कमिटीचे संचालक अनिल खलाटे, इंद्रजीत भोसले, नाना मदने, सुरज खोमणे, पोलीस पाटील शरद खोमणे, संग्राम माळशिकारे, नितीन थोपटे, पृथ्वीराज नलवडे डि. के. खोमणे ,सर्व को-हाळे बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत उपस्थित होते.
सर्व मान्यवर व रक्तदात्यांचे सरपंच रविंद्र खोमणे यांनी आभार मानले.