-->
ऊसाला लागलेली आग विझवण्यासाठी गेलेली अग्निशामक गाडी जळून खाक; माळेगाव कारखान्याचा न्यायालयाने नुकसान भरपाईचा दावा फेटाळला

ऊसाला लागलेली आग विझवण्यासाठी गेलेली अग्निशामक गाडी जळून खाक; माळेगाव कारखान्याचा न्यायालयाने नुकसान भरपाईचा दावा फेटाळला

माळेगाव : उसाला लागलेली आग विझविण्यासाठी पाठविलेली अग्निशामक गाडी जळून खाक झाली, तिच्या नुकसान भरपाईसाठी केलेला सहकारी साखर कारखान्याचा दावा दिवाणी न्यायालयाने फेटाळून लावला.
न्यायाधीश वरिष्ठ स्तर बी. एन. अरवड यांनी हा दावा फेटाळला.

कारखान्याने युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, बारामती यांच्याविरुद्ध १२ लाख रुपयांच्या नुकसानभरपाईचा दिवाणी दावा दाखल केला होता. कंपनीतर्फे ॲड एस. बी. माहेश्‍वरी आणि ॲड. प्रणिता वाळवेकर यांनी कामकाज पाहिले.
माळेगाव बुद्रूक (ता. बारामती) येथील कोळेकर वस्ती परिसरात वीजपुरवठा करणारी तार तुटल्याने शॉर्टसर्किट होऊन उसाच्या पिकाला आग लागली होती. ती विझविण्यासाठी साखर कारखान्याची अग्निशामक गाडी पाठविण्यात आली. परंतु, वाऱ्याच्या वेगाने आग पसरल्यामुळे गाडीला देखील आग लागली होती. कारखान्याने या गाडीचा इन्शुरन्स कंपनीचा विमा घेतला होता. त्यामुळे गाडीच्या नुकसानभरपाईसाठी कारखान्याने कंपनीकडे नुकसान भरपाईची मागणी केली होती.
विमा कंपनीने आरटीओने दिलेले अपघाताच्या दिवशीचे फिटनेस सर्टिफिकेट मागितले होते. पण, कारखानदार हे सर्टिफिकेट उपलब्ध करून देऊ शकले नाहीत. तसेच, पूर्वीच्या फिटनेस सर्टिफिकेटची मुदत संपलेली होती. त्यामुळे मोटार वाहन कायद्याप्रमाणे फिटनेस सर्टिफिकेट नसेल, तर वाहन चालविण्यासाठी असलेले परमीट अस्तित्वात धरले जात नाही, असा निष्कर्ष काढत न्यायालयाने साखर कारखान्याचा दिवाणी दावा फेटाळून लावला.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article