-->
६ वर्षांच्या अनयने सायकलवर ६ तासांत पार केले ८२ किलोमीटर अंतर; सुप्रिया सुळेंनी केलं अभिनंदन

६ वर्षांच्या अनयने सायकलवर ६ तासांत पार केले ८२ किलोमीटर अंतर; सुप्रिया सुळेंनी केलं अभिनंदन

नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक, माजी मुख्यमंत्री, खासदार आणि महाविकास आघाडीचे प्रणेते शरदचंद्रजी पवार साहेब यांचा ८१ वा वाढदिवस साजरा करण्यात आला.


पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर विविध समाजपयोगी कार्यक्रम, रक्तदान शिबिरे, अपंगांना मदत आणि इतरही काही स्पर्धांचे नियोजन करण्यात आले होते.

पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त 'बारामती सायकल क्लब' च्या वतीने आणि 'एनव्हायरमेन्टल फोरम ऑफ इंडिया' यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात बारामती-नीरा-बारामती सायकल स्पर्धेचे नियोजन करण्यात आले होते. सायकल स्पर्धेसाठी ८२ किलोमीटर सायकल चालवायची होती.

या स्पर्धेत एका सहा वर्षाच्या चिमुरड्याने भाग घेत एक विक्रम प्रस्थापित केला आहे. बारामती-नीरा-बारामती या सायकल रॅलीमध्ये अनय मकरंद वारे याने भाग घेत संपूर्ण अंतर म्हणजे ८२ किमी अंतर अवघ्या ५ तास ४५ मिनिटांत पार केले आहे.

अनय हा अवघ्या सहा वर्षांचा आहे. अनयच्या वडिलांनी देखील या आधी दोन सायकल स्पर्धांमध्ये विक्रमी सायकल चालवत कमी तासांमध्ये अंतर पार केले आहे.

वडिलांकडे पाहूनच अनयला सायकलिंग करण्याची आवड निर्माण झाली. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अनयने या आधी भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत बारामती-सुरवडी-बारामती हे ७५ किलोमीटर अंतर कमीत कमी वेळेत पार केले होते.

अनयच्या या यशाबद्दल त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होते आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील फेसबुकवरून अनयला शुभेच्छा दिल्या आहेत. अनयला बारामती सायकल क्लबचे देखील मार्गदर्शन लाभले आहे.

अनयच्या यशाबद्दल वडील मकरंद यांनी अत्यंत आनंद झाला आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. खासदार सुप्रिया ताईंनी ट्विट केल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे.

अनयला आम्ही भविष्यात सायकलिंगमध्ये देश पातळीवरचा खेळाडू म्हणून तयार करणार आहोत आणि सायकलिंगचा बाबतीत नेहमीच त्याला चांगला आधार देत आहोत, असं यांनी म्हटलं आहे.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article