
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटी येथे शौर्यदिन साजरा
Monday, January 3, 2022
Edit
इंदापूर प्रतिनिधी :. कोरोनाच्या तिसर्या लाटेचे धोका लक्षात घेता इंदापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटी येथे भिमाकोरेगावच्या विजयस्तंभाची प्रतिकृती तयार करून शुरवीर योद्धयांना अभिवादन केले.
कोरोनाने गेल्या दोन वर्षांत संपूर्ण जगात थैमान घातले आहे अशा परिस्थितीत गर्दी न करता प्रशासनाला एक सहकार्य म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटी मधील वाघमारे व चितारे परिवारांनी भिमाकोरेगाव येथील विजयस्तंभाची हुबेहूब प्रतिकृती तयार करून छोटासा कार्यक्रम घेतला.
यावेळी प्रमुख पाहुणे सन्मानिय चव्हाण सर यांच्या हस्ते बुद्ध व आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुजन संपन्न झाले. तथा आंबेडकर आणि बौद्ध धम्माचे अभ्यासक विलास दादा मखरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर मखरे यांनी केले.
यावेळी नगरसेविका सुवर्णा मखरे, नगरसेवक अनिकेत वाघ, माजी नगरसेविका वर्षा मखरे, आशा मखरे, सुरेश मखरे, संजय चव्हाण, विनोद ननवरे, नामदेव मखरे, सतीश मखरे, अंकुश भोसले, सम्येक चव्हाण, अशोक वाघमारे व आदींनी उपस्थिती दर्शवली.