-->
हिंदुस्थान फिड्स च्या वतीने वह्या व मास्कचे वाटप

हिंदुस्थान फिड्स च्या वतीने वह्या व मास्कचे वाटप

सोमेश्वरनगर  - प्रतिनिधी
  बारामती येथील हिंदुस्थान फिड्स च्या वतीने कंपनीच्या सी एस आर फंडातून अंजनगाव येथील सोमेश्वर विद्यालयात वह्या व मास्कचे वाटप करण्यात आले.
     बारामती येथील हिंदुस्थान फिड्स प्रा. लि व चिंतामणी दूध संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कंपनीचे जनरल मॅनेजर अजय पिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. यावेळी कंपनीचे अधिकारी विनोद वझेकर, पशुधन विकास अधिकारी डॉ सागर रसाळ, सोमेश्वर साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बी एस परकाळे, माजी संचालक दादासाहेब मोरे, माजी सरपंच दिलीप परकाळे, उपसरपंच सुभाष वायसे, जालिंदर वायसे, राहुल परकाळे, नितीन मोरे उपस्थित होते.
   यावेळी शाळेतील सर्व ३३० विद्यार्थ्यांना प्रत्येकी सहा वह्या व मास्क वाटण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक एम डी बाबर यांनी केले. सूत्रसंचालन हेमंत गडकरी यांनी केले तर आभार दिपक परकाळे यांनी केले.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article