
पारंपारीक शेतीला आधुनीक तंत्रज्ञानाची जोड: श्री विठ्ठल माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची स्ट्रॉबेरी आणी ब्रोकोली शेती
Friday, January 7, 2022
Edit
पणदरे- पारंपारीक शेतीला आधुनीक तंत्रज्ञानाची जोड देत श्री विठ्ठल माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भिकोबानगर येथील विद्यार्थी फाली ( Future Agriculture Leaders of India ) या उपक्रमाअंतर्गत आधुनिक शेतीचे धडे आत्मसात करत आहेत फाली अंतर्गत उभारलेल्या शेडनेटमध्ये विद्यालयाच्या सहकार्याने इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांनी ब्रोकोली व स्ट्रॉवेरी या पिकांचे यशस्वीरित्या उत्पादन घेतले 9 " 2 भारताच्या कृषीक्षेत्रातील भविष्याचे नायक फाली ही संस्था फ्युचर फार्मर्स ऑफ अमेरीका यांच्या प्रेरणेतुन २०१४ साली भारतामध्ये सुरू करण्यात आली यामध्ये वर्गामध्ये होणारी तासीका, तासीकेवर आधारीत प्रात्यक्षी के शेडनेटमध्ये पिक उत्पादन अभ्यासक्रमावर आधारीत अतिथिव्याख्याते, कृषीक्षेत्र भेटी, मातीपरिक्षण, दुधपरिक्षण तसेच वर्षाअखेरीस जैन इरिगेशन जळगाव येथे सर्व शाळांच्या कृपीयंत्र व कृषीव्यवसाय नियोजन स्पर्धा एकूण फाली अभ्यासक्रम आहे यामुळे या अभ्यासक्राची उत्सुकता पाहुन पालकांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक आहे ग्रामिण भाग असुनही ब्रोकोली व स्ट्रॉवेरी या पिकांचे यशस्वीरित्या उत्पादन घेतल्यावद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री अरविंददादा जगताप, सचिव श्री शिवाजीकाका जगताप विद्यालयाचे प्राचार्य श्री एन. पी. पवार, पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी फाली शिक्षीका प्राजक्ता काळे व सहभागी विद्यार्थी यांचे अभिनंदन केले.