-->
शिरसुफळ येथील प्रसिद्ध शिरसाई देवी मंदिरात चोरी; लाखोंचे दागिने केले लंपास

शिरसुफळ येथील प्रसिद्ध शिरसाई देवी मंदिरात चोरी; लाखोंचे दागिने केले लंपास

बारामती तालुक्यातील प्रसिद्ध शिरसाई देवी मंदिराचे दरवाजे तोडून मध्यरात्री देवीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची खळबळजनक घटना समोर आली. चोरी झालेल्या दागिन्यांमध्ये मुकुट, गळ्यातले दागिने  आणि वस्त्रालंकाराचा समावेश आहे. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले चोरीचा तपास सुरू आहे.
बारामती तालुक्यातील शिरसुफळ शिरसाई देवी मंदिर पुरातन आणि प्रसिद्ध आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराला क वर्ग  तीर्थक्षेत्र म्हणून दर्जा मिळाला आहे. असे असताना शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी मंदिराचे दरवाजे तोडून मंदिरात प्रवेश केला. आणि देवीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. सकाळी पुजाऱ्यांनी ग्रामस्थांच्या चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर एकच खळबळ उडाली. दरम्यान पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून गुन्हे शोध पथकाचे माध्यमातून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे चोरीचा तपास केला जात आहे.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article