
अंगणवाडी क्रमांक ४३ मध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
Monday, January 3, 2022
Edit
इंदापूर प्रतिनिधी : राधिकानगर येथील अंगणवाडीमध्ये स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी आज साजरी करण्यात आली.
यावेळी, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लतिका जगताप व हमिदभाई अत्तार यांच्या हस्ते सावित्रीमाईंच्या फोटोचे पूजन संपन्न झाले.
पुनर्विवाह, विधवा स्त्रीयांसाठी आश्रम, स्त्री बालहत्या रोखण्यासाठी नवजात मुलांचे आश्रम उघडणे, सती सारखी अमानुष प्रथा मोडीत काढणार्या, सामाजिक कार्याचा वसा जोपासणार्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची भुमिका लुंबिनी कांबळे या पाच वर्षीय मुलीने साकारून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या प्रसंगी, शितल पोंदकुले, पुजारी मॅडम, अॅड.सुमित वाघमारे, अॅड.विनायक म्हेत्रे यांनी सावित्रीबाई फुलेंचा जीवनपट तथा त्यांचे सामाजिक कार्य, तसेच मुलींसाठी दिलेले शैक्षणिक योगदान या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.
तसेच, सुनिता गिरी, कौशल्या कोकाटे, सुनिता कोळेकर, पुजा करगळ, प्रियांका रणदिवे, वृषाली ननवरे, कोमल कांबळे या पालकांनी सदर कार्यक्रमास आवर्जून उपस्थिती दर्शवली.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी शिक्षिका रूपाली शेलार व आभार प्रदर्शन सहशिक्षिका योजना वाघमारे यांनी केले.