-->
बारामती: मुलीला तिच्या मर्जीविरुद्ध पळून नेवून लग्न केल्याबाबत गुन्हा दाखल

बारामती: मुलीला तिच्या मर्जीविरुद्ध पळून नेवून लग्न केल्याबाबत गुन्हा दाखल

बारामती शहर पोलीस ठाण्यात दिनांक 30 जानेवारी रोजी तक्रार प्राप्त झाली होती की पीडित मुलगी पुण्याला एसटी मधून जात असताना ती पुण्यामध्ये पोहोचली नाही. त्याबाबत पोलिसांनी मिसिंग दाखल करून घेतले.
सदरचा मिशीगचा तपास करून मुलीला पोलीस ठाण्यात आणले असता. सदर मुलीने तक्रार दिली की तिची सहा महिन्यापासून ऋषिकेश अविनाश जगताप राहणार कोळी मळा बारामती याच्यासोबत ओळख होती. ओळखीनंतर सदर मुलगा तिचा सतत पाठलाग करायचा. ती त्याला विरोध करत होती परंतु तो तिला लग्नाची मागणी घालत होता. तिची त्याच्यासोबत लग्न करण्याची मानसिकता नव्हती. सदर मुलीच्या नातेवाईकांनी तिला पुण्याला जाण्यासाठी बारामती एसटी स्टँडवर सोडवली ही माहिती ऋषिकेश अविनाश जगताप याला समजली त्याने सदर मुलीगी ज्या एसटीमधे होती तिचा पाठलाग केला कसबा या ठिकाणी बस थांबवली व तिला खाली उतरण्यास सांगितले परंतु सदर मुलीने त्याचे ऐकले नाही नंतर सदर मुलाने त्या मुलीस मोबाईलवर फोन करून सांगितले की ती जर एसटीमधून उतरली नाही आणि त्याच्यासोबत आली नाही तर तिच्या भावाला मारून टाकू व स्वतःही आत्महत्या करेल. यामुळे सदर मुलगी भयभीत होऊन शिवरी या ठिकाणी एसटी म्हणून खाली उतरली यावेळेस आरोपी ऋषिकेश अविनाश जगताप याने तिला सोबत घेऊन आळंदी या ठिकाणी तिच्या मर्जीविरुद्ध तिच्या सोबत विवाह केला. सदर विवाहाला शुभम कराळे व किरण खोमणे रां बारामती हे साक्षीदार म्हणून उपस्थित होते. सदर महिला ही पोलीस ठाण्यात आल्यानंतर तिने वरील सर्व विरुद्ध तिचा विनयभंग केला व तिच्या मर्जीविरुद्ध विवाह आळंदी या ठिकाणी केला म्हणून त्या दिल्याने तिची फिर्याद दाखल करून ऋषिकेश जगताप व शुभम काळे यांना अटक केलेली आहे व किरण खोमणे फरारी आहे.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article