
हुमणीच्या प्रभावी नियंत्रणासाठी 'फुले मेटारायझियम अँनिसोप्ली"
Saturday, February 5, 2022
Edit
पुणे- गेल्या काही वर्षापासून राज्याच्या विविध भागांमध्ये हुमणी किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी वेळीच सामुदायिक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. तरी मेटारायझियम अॅनिसोप्ली ही किटकभक्षी बुरशी या किडीवर प्रभावी ठरत आहे. ' महात्मा फुले कृषी विद्यापीठा ' अंतर्गत येणाऱ्या ' कृषी महाविद्यालय पुणे -05 ' येथे डॉ. नाजीर तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली चतुर्थ वर्षात शिकत असलेले विद्यार्थी कृषी कार्यानुभव कार्यक्रम ' अंतर्गत “ फुले मेटारायझियम " चे उत्पादन करत आहे. हे मेटारायझियम ' ना नफा ना तोटा ' तत्वावर स्वस्त दरात शेतकयांना उपलब्ध करून दिले जात आहे. फुले मेटारायसियम ही किटक नाशक बुरशी पुढील पिकांवर वापर करू शकतो जसे की द्राक्ष, डाळिंब, पेरू, सिताफळ, आंबा, चिकू, फुलझाडे, भाजीपाला इ. तरी याचा वापर करण्याची पद्धत 1 किलो फुले मेटारायझियम 200 लि. पाण्यात मिसळून साध्या किंवा एच. टी. पी. पंपाने फवारणी करावी.
हुमणी अळीचा बंदोबस्त - पावडर मेटारायझियम अॅनिसोपली हे बुरशीजन्य किटकनाशक २० kg / ha . या प्रमाणात कुजलेल्या शेणखतातून जमिनीत मिसळावे किंवा 10 lit पाण्यामध्ये मिसळवून आठवणी करण्यात यावे अधिक संपर्कासाठी, किक किटकशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय पुणे - 05 शी संपर्क साधावा मो. क्र. 7588680786 ( डॉ. नाजीर तांबोळी )