-->
फलटण रोड नजीक जुगार अड्ड्यावर छापा; ६ जणांना अटक तर; बुलेट, फॅशन गाडीसह २ लाख २० हजार रुपये किमतीचा जुगार मुद्देमाल जप्त

फलटण रोड नजीक जुगार अड्ड्यावर छापा; ६ जणांना अटक तर; बुलेट, फॅशन गाडीसह २ लाख २० हजार रुपये किमतीचा जुगार मुद्देमाल जप्त

काल दिनांक सहा फेब्रुवारी रोजी सायंकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान बारामती शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकास माहिती मिळाली की काही लोक चव्हाण वस्ती फलटण रोड अनिल गुलाबराव चव्हाण याच्या घराशेजारी सार्वजनिक जागेत नगरपालिका स्ट्रीट लाईट मध्ये तीन पाणी जुगार खेळत आहेत अशी माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी गुन्हे तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक सागर ढाकणे ,तुषार चव्हाण, दशरथ कोळेकर ,कल्याण खांडेकर ,अभिजीत कांबळे ,दशरथ इंगोले ,सहाय्यक पोलीस फौजदार संजय जगदाळे यांना सदर ठिकाणी जाऊन कायदेशीर कारवाई करण्यास सांगितले असता सदर ठिकाणी अनिल गुलाबराव चव्हाण, सागर अशोक गायकवाड, सलीम हाजी खान शेख, विजय हनुमंत गुळूमकर ,संजय पांडुरंग गवारे ,विलास विष्णू मोरे ,सर्वजण राहणार चव्हाण वस्ती, कसबा, फलटण रोड हे त्या ठिकाणी तीन पाणी जुगार खेळत असताना मिळाले त्यांच्याकडून रोख अडीच हजार रुपये सव्वा लाख रुपये किंमतीची बुलेट एम एच 45AC 54 45 हिरो होंडा पॅशन एम एच 12 BM 19 29 या दोन मोटारसायकली व वेगवेगळ्या कंपनीचे 6 स्मार्टफोन असा दोन लाख 20 हजार रुपये किमतीचा जुगार मुद्देमाल जप्त करून वरील सर्वांना या गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article