
उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार कोऱ्हाळे, लाटे येथील विविध विकासकामांची भूमिपूजन व उद्घाटने
Saturday, April 16, 2022
Edit
को-हाळे बु ।। - राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बारामतीच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या हस्ते तालुक्यातील विविध विकास कामांची उद्घाटने, भुमीपुजन कार्यक्रम होणार आहे.
सकाळी ७ ते ९ बारामती शहरातील विविध विकास कामांची पाहणी करणार असून त्यानंतर ११ वाजता कोऱ्हाळे खुर्द येथील विविध विकासकामांचे उद्घाटन दादांच्या हस्ते पार पडणार आहे.
यानंतर फलटण- शिरुर राज्य मार्गावरील लाटे येथे निरा नदीवर नव्याने चालू असलेल्या पुलाची पायाभरणी तसेच निरा-इंदापूर राज्यमार्गावरील कठीणपूल ते खामगळपाटी दरम्यान असणारा जुना पुल पाडून नवा बांधायचा की, जुन्या पुलाला जोडून नवा पूल बांधायचा याची पाहणी अजित पवार करणार आहेत.
त्यानंतर काऱ्हाटी येथील कृषीमुल शिक्षण संस्थेच्या वार्षीक सभेला अजितदादा उपस्थित राहणार आहेत.
सदर कार्यक्रमाला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, आयुष प्रसाद, प्रमोद काकडे, बाळासाहेब तावरे, पुरुषोत्तम जगताप, संदिप जगताप, प्रशांत काटे, वसंतराव गावडे, शिवाजीराव टेंगले तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.