
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त मुर्टी येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
Friday, April 15, 2022
Edit
मोरगाव :- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात मोरगाव, तरडोली, मुर्टी, लोणी भापकर आदी भागात मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आली. मुर्टी येथे वृक्षारोपण कार्यक्रम करून अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली.
तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांत आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. मोरगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात बाबासाहेबांच्या प्रतीमेस पुष्पाहार अर्पण करुन अभीवादन सरपंच निलेश केदारी यांनी केले. यावेळी ग्रामविकास अधीकारी जितेंद्र साळुंखे, पोलीस पाटील नयना नेवसे, समीर गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना केदारी म्हणाले बाबासाहेबांचे विचार समाजातील प्रत्येकासाठी प्रेरणादायी असून तळागाळापर्यंत रुजण्याची आवश्यकता आहे.
तालुक्यातील मुर्टी येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाला वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे साहेब व पोलिस हवालदार साळुंखे हे प्रमुख उपस्थितीत होते. मुर्टी ग्रामपंचायत मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून वृक्षारोपणाचा कार्यक्रम केल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते हरीदास जगदाळे यांनी वाढदिवसा निमित्ताने वृक्षारोपण केले