-->
पिसुर्टी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त ११३१ पुस्तकांचे वाटप

पिसुर्टी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त ११३१ पुस्तकांचे वाटप

पुरंदर तालुक्यातील पिसुर्टी  येथील लुंबिनी बुद्ध विहार येथे गायकवाड परिवार व ग्रामस्थांच्या वतीन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची  १३१ सावी जयंती तथागत भगवान गौतम बुद्ध व बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन साजरी करण्यात आली यावेळी ११३१ पुस्तकांचे वाटप करण्यात आले. पिसूर्टी गावातील विद्यार्थ्यांना लाडू वाटप करून  तालुक्यात आकर्षक व अनोख्या पद्धतीने आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.
     पिसुर्टी येथे नेहमी सामाजिक समस्यांचे भान ठेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली जाते.आजही विविध  लोकनायक यांची माहिती देणारी ११३१ पुस्तके मान्यवरांच्या हस्ते  वाटण्यात आली.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा.डॉ. दिगंबर दुर्गाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष भैय्यासाहेब खाटपे उपस्थित होते.

 

यावेळी प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना फक्त ६५ वर्षाचे आयुष्य लाभलं गेलं. परंतु एव्हढ्या आयुष्या मध्ये जगातील सर्वात बुद्धिवान म्हणुन त्यानं नावलौकिक मिळविला. आजच्या दिवशी संपूर्ण जगाने त्यांचा गौरव केला. एखाद्या व्यक्तीने बुध्दीच्या जोरावर ज्ञानाच्या जोरावर पुस्तकाच्या जोरावर आणि घेतलेल्या शिक्षणावर रक्ताचा एकही थेंब न सांडता या जगात सर्वाधिक मोठी क्रांती फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच केली.

पुढील काळात ज्या लोकांना समजा मध्ये प्रगती करायची असेल परिवर्तन करायचे आसेल चांगले दिवस आणायचे आसतील तर बाबासाहेबांचे अनुयायी व्हायला पाहिजे आणि कोणत्याही प्रकारचे युद्ध संघर्ष न करता बुध्दीच्या जोरावर परिवर्तन करावे. हीच शिकवण डॉ. बाबासाहेबांच्या जयंती निमित्त घेण्यासारखी आहे असे ते म्हणाले.

यावेळी भैय्यासाहेब खाटपे यांनी पुस्तके उपलब्ध करून दिली होती . तर यावेळी पोलिस उपनिरीक्षक कैलास गोतपागर, माजी बांधकाम सभापती दत्ताजी चव्हाण, सरपंच सारिका बरकडे, पुणे जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष राजेंद्र बरकडे, काँग्रेस प्रवक्ते ॲडव्होकेट विजय भालेराव, माजी सरपंच सविता बरकडे,  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मानिक चोरमले, आर.पी. आय. चे तालुका युवक अध्यक्ष स्वप्निल कांबळे, सुनिल पाटोळे, निरेचे उपसरपंच राजेश काकडे, महावीर भुजबळ, ॲडव्होकेट पृथ्वीराज चव्हाण, तसेच गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

या जयंती साठी पिसूर्टी लुंबिनी बुद्ध विहार येथिल दादासाहेब गायकवाड, तुकाराम गायकवाड, सोमनाथ गायकवाड, शुभम गायकवाड, निकिता गायकवाड, अंकिता गायकवाड, पवन गायकवाड, सनी साळुंखे यांसह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दादासाहेब गायकवाड यांनी केले तर आभार राजेंद्र बरकडे यांनी मानले.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article